महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात भाविकांच्या बोलेरोचा ब्रेक फेल, पलटी झाल्याने २२ जण जखमी - गाडीचा ब्रेक फेल

महिंद्रा बोलेरो गाडीचा (एमएच २९ बीई ०३७९) श्री दत्त शिखर घाट उतरत असताना ब्रेक निकामी झाल्याने वळणावर पलटी झाला. गाडीमध्ये २२ महिला आणि पुरुष भाविक होते. यामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

बोलेरो ब्रेक फेल झाल्याने पलटी

By

Published : May 9, 2019, 8:13 PM IST

नांदेड- श्री दत्तशिखर घाटात देवदर्शनाला जाणाऱ्या बोलेरो गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यामध्ये गाडी उलटी झाल्याने ५ जण गंभीर तर १७ जण जखमी झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली आहे. जखमींना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

ब्रेक फेल झाल्याने बोलेरो पलटी

श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद दर्गाह वझरा येथे कंदोरी करण्यासाठी मौजे इचोरा, तालुका आर्णी यवतमाळ येथील भाविकांना घेऊन जात असलेला महिंद्रा बोलेरो गाडीचा (एमएच २९ बीई ०३७९) श्री दत्त शिखर घाट उतरत असताना ब्रेक निकामी झाल्याने वळणावर पलटी झाला. गाडीमध्ये २२ महिला आणि पुरुष भाविक होते.

ओम विष्णू जाधव (११), यमुनाबाई जाधव (६०), विष्णू जाधव (३८), बाळू जाधव (४४), मोहन जाधव (६०), तुळशीराम राठोड (४५), संगीता आडे (४२), अविनाश पवार (४२), कांताबाई पवर (५२), रुपेश जाधव (१०), मधुकर जाधव (५०), हिराबाई राठोड (६०), विद्या पंकज आडे (३२), सुदाम राठोड(५०), प्रवीण आडे (८), निखिल राठोड (१९), बाबाराव राठोड (६०), देवीदास जाधव (३०), पवनकुमार आडे (२२), कैलास जाधव(४०), गोपाल राठोड (१५), सुभाष आडे (४२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व राहणार इचोरा (ता. आर्णी जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहेत.

जखमी झालेल्यांपैकी ५ भाविकांना डोके, हात, पाय आणि पाठीला गंभीर मार लागला आहे. अपघात झाल्याचे दिसताच रस्त्याने जाणाऱ्या खासगी वाहनधारकांनी श्री रेणुकादेवीच्या रुग्णवाहिकेने सर्व रुग्णांना माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तातडीने उपचार करून गंभीर जखमीना तात्काळ यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक लक्ष्मण राख, शरद घोडके, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू मुटकुळे, दीपक लिंगायत, सुशील राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि घटनेची नोंद करुन घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details