महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 18, 2021, 8:58 PM IST

ETV Bharat / state

नांदेडमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शनसाठी मोजावे लागतात जादा पैसे

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे हे इंजेक्शना उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु मागणीच्या तुलनेत ते अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे.

blackmarketing  remedesivir injection in nanded
नांदेडमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शनसाठी मोजावे लागतात जादा पैसे

नांदेड - कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे हे इंजेक्शना उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु मागणीच्या तुलनेत ते अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक रुग्णांना तब्बल ४० हजार रुपये मोजावे लागत आहे.

प्रतिक्रिया

रुग्णांच्या नातेवाईकाची फरफट -

नागरीकही कोरोनाचा खर्च परवडत नाही म्हणून वेळेवर उपचार घेत नाहीत. त्यातच शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण व नातेवाईक पुढे धजावत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांची अचानक तब्येत बिघडत आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रूग्णालयाकडे धाव घेत आहेत. अशावेळी बेड मिळवण्यासह इंजेक्शनसाठीही रूग्णांना धावपळ करावी लागत आहे. औषध विक्रेत्यांकडून इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील रूग्णांच्या नातेवाईकांची सर्वाधिक फरफट होत आहे.

रुग्णांकडून उकळले जात आहेत हजारो रुपये -

रेमडेसिवीर उपलब्ध करून देणारे काही तरुण रुग्णालय परिसरात रात्रदिवस दिसून येत आहेत. हे तरूण सहजरित्या गरजू नातेवाईकांना बोलतात. त्यातून 'आम्हाला इंजेक्शन मिळाले, तुम्हाला हवे का, त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात', असा संवाद साधून नातेवाईकांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर हतबल झालेले नातेवाईक पैसे देण्यास तयार होतात. त्यानंतर एक तरुण काही वेळात रेमडेसिवीर घेवून येतो.

रेमडेसिवीरसाठी नियंत्रण कक्ष -

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर देण्याची आवश्यकता भासत असेल, तर रुग्णांची सीटी स्कॅन तसेच रक्त तपासणी करून जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली रेमडेसिवीर पुरवठा, समन्वय आणि नियोजनासाठी चार अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. डॉक्टरांनी रुग्ण किंवा इंजेक्शन त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी देऊ नये. ज्या रुग्णांना हे इंजेक्शन आवश्यक आहे, त्यांची मागणी विहीत नमुन्यात पत्रासह जवळच्या मेडिकल दुकानामार्फत नोंदवावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसाठी रेमडेसिवीर आवश्यक असताना डॉक्टरांकडून दिले जात नाही. असे वाटत असेल त्यांनी जिल्हा प्रशासनातील चार अधिकारी तसेच मदत नियंत्रण कक्ष येथे ज्या संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरिता कंट्रोल रूम हेल्पलाईन (०२४६२-२३५०७७ ) नंबरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नोडल अधिकारी नावालाच -

रेमडेसिवीरचा होणारा काळाबाजार सेना पदाधिकारी जैन यांनी उघड केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतले. परंतु त्यानंतरही हा गोरख धंदा बंद झालेला नाही. त्यात रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीही केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.

डॉक्टरांना त्यांचे काम करू द्यावे -

जिल्ह्यात शासकीयसह खाजगी रुग्णालयात एक हजार बेड वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्ह्याला दररोज पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध आहे. तसेच रेडमीसिव्हर इंजेक्शन ज्या रुग्णांना आवश्यक आहे. त्याच रुग्णांना देण्यात येत आहे. इंजेक्शनही येणाऱ्या काळात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील. गरज असेल त्याच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्या जातील. गरज नसताना उगाच नातेवाईकांनीही मागणी करू नये, तसेच स्वतः डॉक्टर बनू नये, डॉक्टरांना त्यांचे काम करू द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इंटनकर यांनी केले आहे.

हेही वाचा - मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गुंडांची पोलिसांशी हुज्जत; हत्यारे असलेली कार सोडून फरार

ABOUT THE AUTHOR

...view details