महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपची 'महाजनादेश यात्रा' ३० व ३१ ऑगस्टला नांदेडमध्ये

या यात्रेच्या निमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येत्या ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा वसमत विधानसभा मतदारसंघातील जवळाबाजार येथे येणार आहे.

महाजनादेश यात्रा

By

Published : Aug 23, 2019, 12:41 PM IST

नांदेड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू झाला. ३० व ३१ तारखेला ही यात्रा मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर अशा ३ जिल्ह्यातून जाणार आहे.

या यात्रेच्या निमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येत्या ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा वसमत विधानसभा मतदारसंघातील जवळाबाजार येथे येणार आहे. येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता कळमनुरी मतदारसंघातील औंढानागनाथ येथे यात्रेचे स्वागत होणार आहे. दुपारी १ वाजता हिंगोली येथे जाहीर सभा तसेच २ वाजता कळमनुरी येथे स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, दुपारी ४ वाजता भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर येथे महाजनादेश यात्रेचे आगमन होईल. येथे स्वागताचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून बाहेर पडलेले जिल्ह्यातील एक वजनदार नेते बापूसाहेब गोरठेकर यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश सोहळादेखील अर्धापूर येथेच होणार असल्याचे समजते. सायंकाळी ५ वाजता नांदेड येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ३० तारखेला त्यांचा नांदेड येथे मुक्काम राहील. ३१ ऑगस्टला सकाळी १० वाजता नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी १२ वाजता लोहा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर महाजनादेश यात्रा लातूर जिल्ह्यात जाणार आहे . दुपारी २ वाजता अहमदपूर, सायंकाळी ४ वाजता उदगीर तर साडेसहा वाजता लातूर येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ३१ तारखेला त्यांचा लातूर येथे मुक्काम राहील. भाजपने प्रदेशस्तरावर महाजनादेश यात्रेचे नियोजन केले आहे. प्रत्येक दिवशी यात्रेसाठी दिनप्रभारी मंत्री तसेच दिनप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

परभणी ते हिंगोली, नांदेड पर्यंतच्या प्रवासात अतुल सावे तर पुढील प्रवासात संभाजी पाटील निलंगेकर हे दोन मंत्री या यात्रेचे दिनप्रभारी मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.या यात्रेच्या निमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येत्या ३० ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा वसमत विधानसभा मतदारसंघातील जवळाबाजार येथे येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details