महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन - नांदेड जिल्हा बातमी

ओबीसी आरक्षणासंदर्भात व ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आज भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Jun 3, 2021, 4:29 PM IST

Updated : Jun 3, 2021, 4:36 PM IST

नांदेड- ओबीसी आरक्षणासंदर्भात व ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आज भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.

बोलताना व्यंकटेश जिंदम

दिवंगत मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

यावेळी ओबीसी मोर्चाच्या वतीने लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या हातातील विविध फलक लक्ष वेधून घेत होती.

यावेळी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांनी ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली नाही. यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याचे आरोप केले.

हेही वाचा -प्रियकराकडून प्रेयसीचा दगडाने ठेचून खून

Last Updated : Jun 3, 2021, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details