महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद; २९ मोटारसायकली जप्त - मोटारसायकल चोरी नांदेड

मागील काही महिन्यात जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अट्टल चोरांना ताब्यात घेतले आहे.

nanded crime
मोटारसायकल चोरणाऱया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

By

Published : Feb 8, 2020, 8:40 PM IST

नांदेड- मागील काही महिन्यात जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अट्टल चोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २९ मोटारसायकल (अंदाजे किंमत ९ लाख 40 हजार) जप्त करण्यात आल्या आहेत. सदर तीन आरोपींना अटक करून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा -'..या बाबतीत फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवले'

मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने सदर घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे डी. जी. चिखलीकर यांना सूचना देवून आरोपींना पकडण्यासाठी व चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्याबाबत कळवले होते.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार केले होते. सदर नेमलेल्या पथकाला ७ फेब्रुवारीला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शेषराव गावंडे (रा. अजनी ता. बिलोली) याच्याकडे चोरीची स्पेलंडर मोटारसायकल आहे. त्यावरून या पथकाने शेषराव गावंडे यास पकडून त्याच्याकडील स्पेलंडर मोटारसायकल बाबत विचारले असता, त्याने सदरची मोटारसायकल त्याच्यासोबतचा दिलीप कांबळे व मारोती गावंडे यांच्याकडून घेतली असून ती त्यांनी चोरली असल्याचे सांगितले.

हेही वाचा -महापूरानंतर सांगलीचे दूध उत्पादन घटलं,प्रतिदिन दीड लाख लिटर दुधाची घट...

त्यावरून दिलीप अशोक कांबळे (वय २१ ), माधव मारुती गवडे (वय २०), शेषराव रामा गावडे (वय-३० वर्ष) (सर्व रा . रा. अजनी ता. बिलोली नांदेड) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी नर्सी परिसरातून २५ ते ३० मोटारसायकल चोरल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून पॅशन प्रो, स्पेलंडर, डिस्कव्हर, यूनिकॉर्न, होंडा शाईन व एक बूलेट अशा एकूण २९ मोटारसायकल एकूण किंमती नऊ लाख 40 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर तीनही आरोपी व मुद्देमाल जप्त करून रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींपैकी दिलीप कांबळे सराईत मोटारसायकल चोर असून त्याच्यावर पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींकडे अधिक तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. जी. चिखलीकर, पी. डी. भारती, जसवंतसिंघ शाहु, मारोती तेलंगे, सखाराम नवघरे, तानाजी येळगे, बजरंग बोडके, विलास कदम, संजय जिंकलवाड, गणेश घुमाळ यांनी पार पाडली. या पथकाचे पोलीस अधीक्षकांनीदेखील कौतुक केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details