महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रक्ताने अभिषेक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक, भक्ताने केला भांडाफोड

जिल्ह्यातील माहूरमध्ये रक्ताने अभिषेक करून अघोरी प्रयोग करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलीसांनी जादूटोणा कायद्या अंतर्गत अटक केली आहे. विश्वजित कपीले असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे. या भोंदुबाबाचा भांडाफोड बाबाच्या मुंबई येथील प्रविण शेरकर या भक्तानेच केला आहे. या भक्ताकडून (2013 ते 2020)पर्यंत रोख रकमेसह अनेक वस्तू असे 23 लाखाची फसवणूक बाबाने केली आहे. काल रात्री भोंदुबाबासह चार जणांविरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रक्ताने अभिषेक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक, भक्ताने केला भांडाफोड
रक्ताने अभिषेक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक, भक्ताने केला भांडाफोड

By

Published : Oct 14, 2021, 12:33 PM IST

Updated : Oct 14, 2021, 1:59 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील माहूरमध्ये रक्ताने अभिषेक करून अघोरी प्रयोग करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलीसांनी जादूटोणा कायद्या अंतर्गत अटक केली आहे. विश्वजित कपीले असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे. या भोंदुबाबाचा भांडाफोड बाबाच्या मुंबई येथील प्रविण शेरकर या भक्तानेच केला आहे. या भक्ताकडून (2013 ते 2020)पर्यंत रोख रकमेसह अनेक वस्तू असे 23 लाखाची फसवणूक बाबाने केली आहे. काल रात्री भोंदुबाबासह चार जणांविरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रक्ताने अभिषेक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
अघोरी विद्या आणि तंत्रमंत्राचा करायचा वापर

हा भोंदुबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत भुतबाधा घालवणे, गुप्त धन काढून देणे, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळत असे. हा भोंदुबाबा स्वतःला दत्ताचा आवतार असल्याचे सांगून भक्ताकडून अघोरी पुजा करुन घेत असे.

रक्ताने करायला लावायचा अभिषेक

हजारो लोकं या बाबांचे भक्त असून, हा बाबा स्वतःचीही पुजा आरती करुन आंगावर पैसे ठेवायला लावायचा. हा सर्व प्रकार अमावस्या पोर्णिमेच्या वेळेस करायचा. भोंदुबाबा हा मुळचा पुसद जिल्हा यवतमाळचा आहे. सध्या नवरात्रोत्सव असल्याने माहूर येथे त्याने आपले बस्तान मांडले आहे. दरम्यान, या प्रकरणी भोंदुबाबा विश्वजित कपीलेसह भाऊ रवी, कैलास आणि भावजय रसिका विरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -खासदार नवनीत राणांकडून सातत्याने कोरोना नियमांचे उल्लंघन; दुर्गोत्सवात केले ढोलवादन

Last Updated : Oct 14, 2021, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details