महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये इंदिरा गांधी यांचा मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. असा अप्रत्यक्ष इशारा अशोक चव्हाणांनी  खासदार संजय राऊत यांना दिला.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

By

Published : Jan 17, 2020, 3:01 AM IST

नांदेड - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. असे असताना आघाडीतील सहकाऱ्यांनी विधाने करतांना तारतम्य बाळगले पाहिजे, अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

हेही वाचा -कृषिक २०२० महोत्सव : 'त्या' सत्कारावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये इंदिरा गांधी यांचा मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. असा अप्रत्यक्ष इशारा अशोक चव्हाणांनी खासदार संजय राऊत यांना दिला.

हेही वाचा -...तर संजय राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही, नारायण राणेंचा 'प्रहार'

महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. असे मत अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details