नांदेड - विविध कारणांसाठी लोकांनी बँकेकडून कर्ज घेतलेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने बँकांचे हप्ते थांबवण्याची मागणी सर्वप्रथम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवरुन ३ महिने हप्ते बंद करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या हप्त्यांवरी व्याज आकारणी अद्याप सुरुच आहे.
बँकेचे हप्ते थांबवले पण व्याजदेखील थांबवा - अशोक चव्हाण - बँकेचे हफ्ते
बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास मुभा मिळाली असली तरी या हप्त्यांवर व्याज आकारणी मात्र सुरूच असल्याने गृहकर्ज आणि अन्य सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याज आकारणी बंद करण्याची मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आहे. काहिंचे पूर्णपणे बंद पडले. अशा कठिणप्रसंगी व्यावसायिकंनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थांबवण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. केंद्राने या मागणीचा सकारात्मक विचार करून ३ महिने हप्ते बंद करण्याचे जाहीर केले होते.
मात्र, यामध्ये हप्ते भरण्यास मुभा मिळाली असली तरी या हप्त्यांवर व्याज आकारणी मात्र सुरूच असल्याने गृहकर्ज आणि अन्य सर्व प्रकारच्या कार्जांवरील व्याज आकारणी बंद करण्याची मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.