महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अशोकराव आता तुमचं काय होणार? - ashok chavan news

काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला आहे. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांच्या पराभवामुळे राज्यात काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसला आहे.

अशोकराव

By

Published : Sep 20, 2019, 2:51 PM IST

Updated : Sep 20, 2019, 4:46 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू असून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. लोकसभा निवडणुकीत नाराजीचा मोठा फटका बसल्याने ते पूर्णवेळ मतदारसंघात थांबून आहेत. मतदार आणि कार्यकर्त्यांशी चव्हाण व्यक्तीशः संपर्कात आहेत.

हेही वाचा - पवारांचे भाकीत ; " ते " आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत

काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला आहे. भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. अशोक चव्हाण यांच्या पराभवामुळे राज्यात काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसला आहे.

विधानसभेला काय होणार?

भोकर मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा गड मानला जातो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मागील पाच वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सतत चव्हाणांचे वर्चस्व राहत असल्यामुळे येथील जनतेतही एकप्रकारे नाराजीचा सूर दिसून येत आहे.

हेही वाचा - कोण होतास तू; काय झालास तू, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?

अशोक चव्हाण यांच्या पत्नी या मतदारसंघातून आमदार असूनसुद्धा चव्हाणांना लोकसभेला या मतदारसंघातून केवळ 4 हजार 700 मतांची लिड मिळाली होती. तर, वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात तब्ब्ल 27 हजार मतं घेत अशोक चव्हाण यांना पाडण्यात महत्तवाचा रोल निभावला होता. त्यामुळे असे अनेक प्रश्नांचे डोंगर समोर असताना अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणूक आव्हानात्मक जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

हेही वाचा - 'गाव मोठ्ठा विकास छोटा' ... कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा

दरम्यान, नांदेडचे राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर हे आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भोकरसाठी गोरटेकरांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश' यात्रेचा मार्ग मुद्दाम भोकरमार्गेच -

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही मुद्दाम भोकर मार्गे पुढे रवाना झाली होती. यावेळी भाजपकून मोठे शक्तीप्रदर्शन करत महाजनादेश यात्रेचे भोकरमध्ये स्वागत करण्यात आले होते. तसेच खास सत्कार कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात आला होता. चव्हाणांच्या गडाला धक्का देण्यासाठीच व आपली शक्ती किती आहे हे मुद्दाम दाखवण्यासाठीच ही यात्रा नियोजित भोकर मतदारसंघातून नेण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकंदरीत अशोक चव्हाण यांना विधानसभेतही पाडण्यासाठी भाजपने मोठी तयारी केल्याचे चित्र दिसत आहे.

प्रदेशाध्यक्ष पदामुळे भोकरकडे दुर्लक्ष?

2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण येथून आमदार आहेत.

यादरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. त्यामुळे भोकर मतदारसंघात विकासाचे कामे होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडलेच नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही या काळात अशोक चव्हाण यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांना भोकरकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळालाच नाही. याचाच मोठा फटका त्यांना या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

भोकर मतदारसंघाची परिस्थिती -

भोकर तालुका एकेकाळी सिंचनाने समृद्ध होता. इसापूर धरणाच्या पाण्यावर शेतकरी ऊस, केळी आणि हळद अशी नगदी पिके घेत होती. मात्र, पैनगंगा नदीवर इसापूर धरणाच्या वरच्या बाजूला अनेक बंधारे झाले आहेत. त्यामुळेच गेल्या चार वर्षापासून येथील सिंचनाचा विकास जवळपास खुंटला आहे. त्याचा फटका शेतकऱयांना मोठ्याप्रमाणात बसला आहे. हाच एक नाराजीचा सूर चव्हाण यांच्याविरोधात पहायला मिळत आहे.

त्यामुळे पारडे कोणाचे जड? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर येथे नक्कीच अशोक चव्हाणांचे पारडे जड आहे. मात्र, त्यांना ही विधानसभा निवडणूक नक्कीच तेवढीच आव्हानात्मक जाणार हे मात्र नक्की आहे.

Last Updated : Sep 20, 2019, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details