महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या तुलनेत नांदेड सुरक्षित ठेवण्यात पोलीस प्रशासनाला यश - अशोक चव्हाण - ashok chavan on covid 19

अर्धापूर शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीला आल्याने ती पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. या कामाचे भूमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हास्ते करण्यात आले.

ashok chavan
नवीन कामाचे भूमीपूजन करताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Jun 28, 2020, 9:19 AM IST

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत आहेत.त्यामुळे मुंबईच्या तुलनेत नांदेड जिल्हा सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. लोकांच्या सुरक्षितेसाठी 40 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. पोलिसांच्या निवाऱ्यासाठी 15 कोटीचा निधी उपलब्ध झाला असून, ही निवासस्थाने सुसज्ज करण्यात यावीत. अर्धापूर शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न राहिला असून, नगरविकास विभागातून पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी अर्धापुरात दिली.

अर्धापूर शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीला आल्याने ती पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. या कामाचे भूमीपूजन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हास्ते करण्यात आले. पोलीस ठाण्याच्या सभागृहात छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरात पोलीस ठाणे व अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सुसज्ज बांधण्यात येणार आहेत. ही चांगली गोष्टी असून हे काम दर्जेदार करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी चौपट मावेजा मिळणार आहे. यासाठी महसूल प्रशासनाने चांगले काम केले आहे. याचप्रमाणे रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीलाही चौपट मावेजा मिळण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, माधव पटणे, संदीप पटणे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी स्वागत केले.

अर्धापूर पोलीस ठाण्याचा होणार कायापालट -

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या या नवीन बांधकामात पोलीस ठाण्याची इमारत, निवास संकुलाचा समावेश आहे. या संकुलात इमारत प्रकार दोनचे 40, प्रकार तीनचे 6 आणि प्रकार चारचे एक असे एकूण 47 निवासस्थाने आहेत. या निवासी संकुलासाठी 11 कोटी 93 लाख 96 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहे. तर पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी 3 कोटी 40 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहे. यातून निजामकालीन असलेल्या पोलीस ठाण्याचे स्वरूप बदलून कायापालट होणार आहे.

अर्धापूर शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला 5 कोटीचे विशेष अनुदान -

अर्धापूर शहरातून नागपूर-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-161 गेला असल्याने या महामार्गासाठी अर्धापूर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या जमिनी यासाठी उपयोगात आल्या. संंबंधीत महामार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बाधितांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार मोबदला मिळावा यासाठी येथील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. या न्याय मागणीचा विचार करून आता राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाप्रमाणे सुयोग्य मोबदला बाधितांना दिला जाणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचबरोबर अर्धापूर शहरातील रस्ते विकास व इतर अत्यावश्यक कामांसाठी नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचे विशेष अनुदान उपलब्ध करून दिले आहे. या अनुदानातून शहराच्या विकासाचा मार्ग आता अधिक प्रशस्त होईल, असे त्यांनी सांगितले.

ज्याला कोरोना झाला त्यालाच वेदना कळतात -

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनावर मात करून प्रथमच अर्धापूर शहरात आले. ते म्हणाले की कोरोना ज्याला होतो, त्याच्या वेदना त्यांनाच कळतात. तसेच बाधा झाल्यावर माणूस जागा होतो. आपल्या कुटुंबाची व आपली काळजी घ्या सुरक्षित रहा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details