महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!

जिल्हा परिषद नांदेडच्या चारही सभापतीपदांवर काँग्रेसच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये उपसभापतीपद हे शिवसेनेला गेले मात्र, राष्ट्रवादीला त्यातील एकही सभापतीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच
जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच

By

Published : Feb 4, 2020, 8:30 AM IST

नांदेड - जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदांची बिनविरोध निवड झाली आहे. ही चारही पदे काँग्रेसने खिशात घातली आहेत. समाजकल्याण सभापतीपदी रामराव नाईक, महिला बाल कल्याणच्या सभापतीपदी सुशीला बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब रावणगावकर आणि संजय बेळगे यांची विषय समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसने डाव साधला आहे, अशी चर्चा आहे. १० सदस्य असूनही सत्तेत स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या हाती भोपळा आल्याचे चित्र आहे. शिवसेनेला उपाध्यक्षपद देऊन खूश केले असले तरी, सभापती पद मात्र मिळू शकले नाही.

जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच

महाआघाडी सत्तेत असलेल्या काँग्रेसने ही चारही सभापती पदे स्वतःकडे ठेवली आहेत. मागील १५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत किंबहुना जिल्ह्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या तालमीत राहून कठीण वेळी काँग्रेसला लहान भावाप्रमाणे साथ दिली. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी असो किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत असो राष्ट्रवादीने काँग्रेस पार्टीला वेळोवेळी साथ दिली. मात्र, काँग्रेसने आज गोरठेकर, कुंटूरकर, पाठोपाठ नाईक व धोंडगे गटाचाही केसाने गळा कापला, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उमटत आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापती व विषय समितीच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीचा अजेंडा ठरल्यानंतरही राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला सभापती पदापासून दूर ठेवण्याची कूटनीती सोमवारी झालेल्या सभापती निवडीच्या वेळेस बघायला मिळाली.

हेही वाचा -नांदेडमध्ये टायर फुटून कार पलटल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी

नांदेड लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेशी जवळीक केल्याची चर्चा ताजी असताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत पूर्वी ठरलेल्या सभापतीपदाच्या शब्दाला न पाळता चारही पदे आपल्याकडे ठेऊन घेतली. यामुळे, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. तर, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना ही खेळी करण्यासाठी जवळच्यांनी डोस पाजल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात होती. परिणामी आघाडीत बिघाडी झाल्याने आगामी जिल्हा बँक व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचे पडसाद दिसून येतील असे दिसते.

हेही वाचा -नांदेड : शिक्षकाकडून अश्लील चित्रफीत दाखून तिसरीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details