महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वारातीम विद्यापीठाच्या लेखी परीक्षा पूढे ढकलल्या... - कोरोना

विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२० पदव्युत्तर, विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

university
university

By

Published : Apr 3, 2020, 12:10 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने १४ एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२० पदव्युत्तर, विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर दि.१५ एप्रिलनंतर प्रकाशित करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशानुसार प्राचार्य, प्राध्यापक आणि संशोधक हे आपली सर्व कामे 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या दृष्टीने दि.१४ एप्रिलपर्यंत विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयाचे सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज संपूर्णतः बंद आहेत. यामुळे विद्यापीठाच्या पदव्युत्तर, विधी आणि इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारीत वेळापत्रक आणि या अभ्यासक्रमाचे परीक्षा आवेदनपत्र विहित शुल्कासह परीक्षा विभागामध्ये सादर करण्याच्या तारखा विद्यापीठ संकेतस्थळावर दि.१५ एप्रिलनंतर प्रकाशित करण्यात येणार आहेत.
संबंधित प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्याच सूचना, परिपत्रक आदी अधिकृत समजण्यात यावे, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details