महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकारणातील खोटेपणाच अशोक चव्हाण यांना संपवेल - असदुद्दीन ओवैसी - nanded aimim

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार साबेर चाऊस व फेरोज लाला यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी

By

Published : Oct 10, 2019, 12:14 PM IST

नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकारण खोटारडे आहे. हेच खोटारडे राजकारण चव्हाण यांना संपवेल, अशी घणाघाती टीका एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नांदेड येथे आयोजित सभेत बोलताना केली. ओवैसी नांदेड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार साबेर चाऊस व फेरोज लाला यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते.

असदुद्दीन ओवैसी नांदेडमधील सभेत बोलताना

हेही वाचा - 'राफेल' पुढे ठेवलेल्या लिंबू वरून ओवैसींनी परभणीत उडवली भाजप-सेनेची टर

अशोक चव्हाण मुसलमानांना हिंदुची मते मिळत नाहीत, असे सांगतात आणि आम्हाला उमेदवारी नको असे मुस्लीम ईच्छूक उमेदवारांकडून लिहून घेतात असा आरोप ओवैसी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.

हेही वाचा - ठरलं! राहुल गांधी 'या' तारखेला राज्यात प्रचाराला येणार

ABOUT THE AUTHOR

...view details