महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कार पार्किंग'वरून तरुणास बेदम मारहाण, वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कार पार्किंग करण्याच्या कारणावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

वजिराबाद पोलीस ठाणे

By

Published : May 13, 2019, 2:08 PM IST

नांदेड- कार पार्किंग करण्याच्या कारणावरुन एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

वजिराबाद पोलीस ठाणे


शहरातील हिंगोली गेट माता गुजरी कॉम्प्लेक्ससमोर कार पार्किंग केली या कारणावरून जयदेवसिंग हजुरिया व ईश्वरसिंग लोहिया या दोन तरुणांनी हरप्रीतसिंघ मेजर याच्याशी वाद घातला. ईश्वरने हरप्रीतसिंग मेजर यास मारहाण करून ठार मारण्याची धमकीही देली. तर जयदेवने त्याच्या दुकानातील लोखंडी खुर्ची कारवर फेकून काच फोडली. या घटनेत कारचे २० हजारांचे नुकसान झाले.


या प्रकरणी मेजरने दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी कलम ३२३, ५०४,५०६,३५२,४२७,३४ व भारतीय हत्यार कायदा कलम २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस.पी.शिंदे करीत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details