नांदेड -मागील आठवड्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला. नांदेड शहरातही एका सहा वर्षीय बालकावर त्याच्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.
पवन ईबीतवार असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या एका सहा वर्षीय बालकाला आरोपी पवन याने पैशांचे आमिष दाखवून शौचाकडे सोबत नेले. घरापासून दूर नेल्यानंतर आरोपीने बालकावर लैंगिक अत्याचार केला.
हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा
पीडित बालकाने घरी आल्यानंतर झालेला प्रकार आईला सांगितला. आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पवन ईबितवार याच्या विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३७७ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पवन हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिली.