नांदेड - संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेतील हॅकिंग प्रकरणात आणखी एका केनियन आरोपीस विशेष तपास पथकाने कर्नाटक राज्यातून काल ताब्यात घेतले. त्यामुळे, आता ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या ५ झाली आहे.
हेही वाचा -समन्यायी पाणी वाटप हा अत्यंत आव्हानात्मक विषय - अशोक चव्हाण
१४ कोटी ४६ लाख ५ हजार ३४७ रुपये वळती केले होते
शंकर नागरी सहकारी बँकेचे वजिराबाद भागात असलेल्या आयडीबीआय बँकेत खाते आहे. दरम्यान, शंकर नागरी बँकेचे खाते हॅक करून त्यातील १४ कोटी ४६ लाख ५ हजार ३४७ रुपये वळती केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पथकाने दोन महिला व दिल्ली येथून एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्यांना ३० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींची संख्या ५ वर..
सदर आरोपींना अटक केल्यानंतर आता एका केनियन आरोपीस विशेष तपास पथकाने काल कर्नाटक राज्यातील धारवाड येथून ताब्यात घेतले. त्यामुळे, ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या आता ५ झाली असून यामध्ये एका विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे.
हेही वाचा -पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड..