नागपूर - नागपूर वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे एक विशेष पथकाच्या सहायाने गोंदिया येथे वनविभागाच्या पथकासह सालेकसा परीसरात काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बिबट्याची कातडी, दात, मिशा, पंजे इत्यादी मुद्देमालही यावेळी या पथकाने जप्त केला आहे. (Leopard skin, teeth, mustache, claws ) नागपूर वनविभागाच्या विशेष पथकाने मागील काही महिन्यांपासून वाघाच्या व इतर वन्यप्राण्यांच्या अवयवाच्या तस्करी करणाऱ्या अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी आणखी काही माहिती नागपूर वनविभागास प्राप्त झाली होती. ( Nagpur Forest Department ) त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्यांची नावं
ताब्यात घेतलेल्यांमध्ये राधेश्याम जोहर उईके वय 50 वर्ष रा. दल्लाटोला सालेकसा, जागेश्वर सुप्रितदास दसऱ्या वय 31 वर्ष रा. धनुसुरवा/बोरी सालेकसा, पप्पु जोहरलाल मडावी वय 32 वर्ष रा. जांभळी सालेकसा, दिनेश प्रभुद्याल श्रीवास्तव वय 49 वर्ष रा. खात भंडारा, संदीप चोखा रामटेकर वय 38 वर्ष रा. पालोरा भंडारा, दिनेश ताराचंद शहारे वय 32 वर्ष रा. देवरी भंडारा, विनोद सुखदेव दशरिया वय 27 वर्ष रा. ब्राम्हणटोला सालेकसा, लितेश कृष्णकुमार कुंभरे वय 32 वर्ष रा. बाघनदी राजनांद गाव छत्तीसगड, परशराम रमा मेश्राम वय 50 वर्ष रा. गिरोला सालेकसा, सुभेचंद सोनसाय नेताम वय 40 वर्ष रा. दल्लाटोल सालेकसा, इंद्रलाल नेताम वय 30 वर्ष रा. दल्लाटोल सालेकसा असे नाव आहेत.