महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Crime : नांदेडमध्ये सशस्त्र जमावाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, 6 जण जखमी; गोरक्षक असल्याचा ग्रामस्थांचा दावा - Shankar Rapeli died

नांदेडमध्ये 10 ते 12 जणांच्या सशस्त्र हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर 6 जखमी जखमी झाले आहेत. शंकर रापेली असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गोरक्षक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सह जखमींपैकी चार जण गंभीर जखमी आहेत. आरोपीना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगत शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको केला आहे.

Nanded Crime
Nanded Crime

By

Published : Jun 20, 2023, 5:12 PM IST

पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांची प्रतिक्रिया

नांदेड :किनवट तालुक्यातल्या शिवणी गावाच्या परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याच्या हल्ल्यात 1 तरुण ठार तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली. हा तरुण गोरक्षक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिवणी, चिखली गावातील 7 युवक तेलंगाणात नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. ते परत येत असताना शिवणी गावाजवळील पुलावर एक बोलेरो पिकअप गाडी दिसली. त्यांनी अधिक चौकशी कली असताना बोलेरोतील टोळक्यांनी अचानक सशस्त्र हत्यारे घेऊन या युवकांवर हल्ला चढवला. यात शंकर रापेली या युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. आरोपीना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगत शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको केला आहे.

गोरक्षक असल्याचा ग्रामस्थांचा दावा :नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पारावपेट परिसरात 10 ते 12 लोकांनी मिळून 7 गोरक्षक कार्यकर्त्यावर प्राणघातक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती, इतर 6 जन गोरक्षक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या हल्ल्यात इतर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, शशीकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्ठळी भेट दिली.

शिवणी परिसरात पोलीस बंदोबस्त :शिवणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. किनवट तालुक्याच्या चिखली येथील सोपानरेड्डी पेंटेवार यांच्या तक्रारीवरुन इस्लापूर पोलिसांनी अज्ञात १० ते १२ कसायांवर भादंविच्या कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १५९, ४२७ शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी फारार असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेनंतर विशेष पोलीस महानिरक्षक, शशीकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत कोकाटे यांनी घटनास्ठळी भेट देत आरोपीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा -Mumbai Crime News: भयानक! लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रियकराने रिक्षात विवाहित प्रेयसीचा चिरला गळा

ABOUT THE AUTHOR

...view details