महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास ७ वर्षांचा कारावास - sumedh bansode

लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर बलात्कार केल्याप्रकणी संतोष दिगंबर इबितवार (रा. इज्जतगाव, ता. नायगाव) यास न्यायाधिशाने ७ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

Breaking News

By

Published : May 15, 2019, 4:08 PM IST

Updated : May 15, 2019, 4:40 PM IST

नांदेड- बिलोली येथे लग्नाचे अमिष दाखवून पीडीत मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस ७ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी.कचरे यांनी सुनावली आहे. संतोष दिगंबर इबितवार (रा. इज्जतगाव ता, नायगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


आरोपी हा पीडीत मुलीची दिशाभूल करत तुझ्यासोबत मी लग्न करणार, असे सांगून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पिडिता गर्भवती राहिली. ही माहिती पीडित मुलीच्या भावास समजल्यानंतर त्याने बहिणीला विश्वासात घेऊन हकिकत जाणून घेतली. तेव्हा बहिणीची फसवणूक होईल, या भितीने कुंटुर तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावेळी विविध कलमान्वे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तापासाअंती आरोपीविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.


सदर प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलागी, डिएनए अहवाल, तपासणी अमंलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेऊन ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे एस.बी.कुंडलवाडीकर यांनी काम पाहिले.

Last Updated : May 15, 2019, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details