नांदेड- राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांची नाराजी आहे. कोरोना संकटामध्ये आर्थिक ओढाताणीने कंबरडे मोडले असताना सामान्य नागरिकांना आता वीज बिलाचा शॉक मिळत आहे. अक्षरशः डोळे पांढरे करणारे बिल सामान्य ग्राहकांना दिली जात आहेत.
हेही वाचा-देशातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस; भाजप नेत्याचा दावा
घरात केवळ एक लाईट आणि एक पंखा असलेल्या कुटुंबाला ६१ हजार ४८० रुपयांच लाईच बिल पाठवण्याचा पराक्रम महावितरण कंपनीने केला आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथील लक्ष्मीबाई नारायण डूबुकवाड या गरीब कुटुंबाला हे बिल आलं आहे.
मजुराला ६१ हजार ४८० रुपये बिल येवढे बिल भरायचे तरी कसे?
महावितरण कंपनीचा गलथान कारभार हा सर्वश्रुत आहे. लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा बिलं देऊन महावितरण कंपनीने तर हद्दच केली आहे. घरात केवळ एक पंखा आणि एक लाईट असलेल्या कुटुंबाला दोन महिन्याचं चक्क ६१ हजार ८४० रुपयाचं बिल पाठवलं आहे. मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतीतील हा प्रकार आहे. मजुरी करणाऱ्या या कुटूंबियांना या प्रकारामुळे धक्का बसला. येवढे बिल भरायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे.
हेही वाचा-45 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 79 लाखांवर
महावितरणचे अधिकारी मात्र गप्प!
अश्या घटना वारंवार घडत असताना महावितरणचे अधिकारी मात्र गप्प आहेत. या कुटुंबाला महावितरण न्याय मिळवून देईल का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.