महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर; दहा दिवसांत 222 मृत्यू

25 मार्च ते 4 एप्रिल या दहा दिवसांत 10 हजार 145 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 222 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळींच्या बाबतीत नांदेड मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर; दहा दिवसांत 222 मृत्यू
नांदेड जिल्ह्यात कोरोना बळींच्या वाढत्या संख्येने चिंतेत भर; दहा दिवसांत 222 मृत्यू

By

Published : Apr 5, 2021, 10:06 AM IST

नांदेड :जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांची परिस्थिती पाहिली तर रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात वाढच होत आहे. 1 मार्चपासून ते आतापर्यंत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली असून हा आकडा 23 हजारवरून थेट 47 हजारांवर गेला आहे. 25 मार्च ते 4 एप्रिल या दहा दिवसांत 10 हजार 145 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 222 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळींच्या बाबतीत नांदेड मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नांदेडमध्ये कोरोनामुळे दहा दिवसांत 222 मृत्यू
दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढलेकोरोनाच्या पहिल्या लाटेत किमान आठ दिवसांनंतर रुग्णांना कोरोनाचा त्रास वाढत होता. दुसऱ्या लाटेत तीन ते चार दिवसांतच त्रास वाढत असल्याचे अनेक जण सांगत आहेत. तपासणी न करता अंगावरच आजार काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 895 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.महिनाभरात रुग्णसंख्या दुप्पटनांदेडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या सध्या ४७ हजार ६६९ आहे. एकाच महिन्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. मार्चच्या सुरूवातीला कोरोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ७४४ होती. कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही ९४.०४ टक्क्यांवरून घसरून ७४.८६ टक्क्यांवर आले आहे. तर मृत्यूचे प्रमाण तीन टक्क्यांवर गेले आहे. १ मार्चला आलेल्या तपासणीतील सरासरी १०.४४ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह होत्या. ३१ मार्चला एकूण या सरासरीत १४.०३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर मार्च महिन्यात ही सरासरी २४.३६ टक्के इतकी आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात नांदेड जिल्हा मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असून कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे.मराठवाड्यात 4 एप्रिलपर्यंत झालेले मृत्यू
  • औरंगाबाद-1758
  • नांदेड-896
  • लातूर- 810
  • उस्मानाबाद-602
  • बीड-550
  • जालना-524
  • परभणी-442
  • हिंगोली-97

    नांदेडमधील कोरोनाची स्थिती दृष्टीक्षेपात
  • एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 34 हजार 260
  • एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 79 हजार 742
  • एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 47 हजार 669
  • रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या - 35 हजार 642
  • एकूण मृत्यू संख्या - 896
  • उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - 74.76 टक्के
  • रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित व्यक्ती - 10 हजार 891, अतिगंभीर प्रकृती असलेले - 153

ABOUT THE AUTHOR

...view details