महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या दिवशी 2 उमेदवारी अर्ज दाखल; 527 अर्जांची विक्री - उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड उत्तर मतदारसंघातून इंडियन डेमोक्रॅटिक पक्षाकडून नाविद पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे. तर नांदेड दक्षिण मतदारसंघातून डेमोक्रॅटिक पक्षाकडून जाफरअली खान मोहमद अली खान यांनी अर्ज दाखल केला आहे.

नांदेड

By

Published : Sep 28, 2019, 5:46 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. पहिल्या दिवशी 9 विधानसभा मतदारसंघांतून 286 जणांनी 527 अर्ज मोफत स्वरूपात घेतले. नांदेड - उत्तर व नांदेड - दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रत्येक 1 या प्रमाणे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळाली आहे.

हेही वाचा -शिवसेनेशी वाईट वागले त्याचे फळ आता मिळतंय, उध्दव ठाकरेंचा पवारांना टोला

नांदेड उत्तर मतदारसंघातून इंडियन डेमोक्रॅटिक पक्षाकडून नाविद पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे. तर नांदेड दक्षिण मतदारसंघातून डेमोक्रॅटिक पक्षाकडून जाफरअली खान मोहमद अली खान यांनी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभा निहाय अर्जांची विक्री -

  1. किनवट -36
  2. हदगाव - 20
  3. भोकर -107
  4. नादेड उत्तर-167
  5. नांदेड दक्षिण- 98
  6. लोहा- 14
  7. नायगाव- 41
  8. देगलूर - 15
  9. मुखेड - 13

ABOUT THE AUTHOR

...view details