नांदेड :येथील 18 भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील 1 असे 19 भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाडवरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोचून पुढे दिनांक 6 जुलै 2023 रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेवून तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
उपजिल्हाधिकारी समन्वय साधून :निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून जिल्ह्यातील खालील व्यक्ती या तिथे अडकलेल्या आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. हे आहेत अडकून पडलेले नागरिक:
1. अनिल पांपटवार
2. संजय मनाठकर
3. राजेंद्र मनाठकर
4. मंजुषा दमकोंडवार
5. अरुण दमकोंडवार
6. प्रवीण सोनवणे
7. विजया सोनवणे
8. विजयनाथ तोनशुरे
9. शिवकांता तोनशुरे
10.सुरेखा पत्रे
11. शामल देशमुख
12. प्रमोद देशपांडे
13. मंजुषा देशपांडे
14. मिसेस कडबे
15. तुकाराम कैळवाड
16. पंकज शीरभाते
17. प्रणिता शिरभाते
18. आकुलवार
19. निलेश मेहेत्रे अशी आहेत.