नांदेड - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीला जिल्हा न्यायालयाने १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच साडेसहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी - सक्तमजुरी
रागाच्या भरात अफरोज याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात अफरोजच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती. तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
किनवट शहरात आई आणि भवासह अल्पवयीन मुलगी राहत होती. गेल्या ५ जून २०१६ ला सकाळच्या सुमारास आई आणि भाऊ दुकानात गेले होते. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याठिकाणी पीडितेच्या घरमालकाचा मुलगा अफरोज आला. घरात एकटी असताना अफरोज का आला? असे जाब तिने त्याला विचारला. त्यावर रागाच्या भरात अफरोज याने पीडितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध पडली होती. सायंकाळी तिची आई घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात अफरोजच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली होती.
तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम यांनी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरी आणि साडेसहा हजार रुपये दंड ठोठावला.