नांदेड : नांदेड जिल्ह्यात दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन 10 जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील नांदेड - तामसा रोडवर पिंपराळा पाटीजवळ हा अपघात घडला आहे. स्विफ्ट कार आणि एर्टिगा गाडी पिंपराळा जवळ एकमेकांशी धडकल्या. स्विफ्ट गाडी मध्ये एकजण तर एर्टीगा गाडी मध्ये 7 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 9 प्रवासी होते. अपघातात दोन्ही गाड्यांमधील सर्व जण जखमी झाले आहे. जखमींवर तामसा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
कारची समोरासमोर धडक : नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. हदगाव तालुक्यातील कांडली खुर्द येथील रहिवासी सचिन साहेबराव कारले (वय 31) आपल्या कारने नांदेडकडे जात होते. तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ कारले यांच्या कारची समोरून येणाऱ्या एम. एच. 29 बि.पी 0529 या दुसऱ्या कारसोबत समोरासमोर धडक झाली. यात सचिन कारले आणि समोरील गाडीतील 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तामसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी सर्वांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे.