नागपूर- जिल्ह्यातील खापरखेडा येथे एका ३० वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रशांत घोडेस्वार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
पाच जणांनी केली हत्या-

प्रशांत घोडेस्वार हा बुधवारी रात्री घराकडे जात असताना आरोपींनी त्याला राजबाब बिअरबारसमोर अडवले. त्यावेळी त्यांनी जुना वाद उकरून भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर जवळच्या धारधार शस्त्राने प्रशांतच्या गळ्यावर त्यांनी वार केले. या हल्ल्यात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार पाच आरोपींनी त्याचा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. प्राथमिक माहिती नुसार खुनाची घटना जागेच्या वादातून घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांतर पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे. प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.