नागपूर -पेट्रोल दरवाढी विरोधात नागपुरात युवक काँग्रेसने अभिनव आंदोलन करत सरकाराचा निषेध केला आहे. हे आंदोलन नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून या आंदोलनात मोदींचे झोपलेले बॅनर ठेवून 'पेट्रोलचे भाव 25 पाव' असे म्हणत युवक कॉंग्रेसने गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर हे आंदोलन केले आहे.
अभिनव आंदोलन
यावेळी युवक कॉंग्रेसने पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलचे दर विचारले. दर ऐकताच आंदोलकांनी झोपून आंदोलन सुरू केले. वाढले पेट्रोल दर ऐकून सामान्य नागरिक सुन्न होऊन खाली पडण्याची वेळ आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झोपलेले असल्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फोटोचे बॅनर लावून करण्यात आले. या अभिनव आंदोलनामुळे पेट्रोलपंपावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. शिवाय यावेळी ऑक्सिजन लावून गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र उभे करण्याचे काम युवक काँग्रेसचे नगरसेववक बंटी शेळके आणि त्यांचा पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान काहीवेळाच गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
हेही वाचा-काँग्रेसच्या कार्यक्रमात पोलिसांचे काय काम? आमदार भाई जगताप पोलिसांवर संतापले