नागपूर -कोरोना डेल्टा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकेबंदीची पोलिसांची कारवाई सुरू होती. दरम्यान, मनोज ठवकर हे दुचाकी वरून जात असतांना त्यांचा पोलिसाच्या गाडी धडक दिली. यावेळी पोलिसांनी त्याला मारहाण केली व यातच त्याची तब्येत बिघडली. पोलिसांनी त्याला पारडी येथील भवानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मनोज याला मृत घोषित केले. या घटनेमुळे नातेवाईक हे संतप्त झाले असून त्यांनी दवाखान्याला घेराव दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मनोजचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा हॉस्पिटलला घेराव - वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल -
मनोज काही कामानिमित्ताने बाजाराला गेले होते. काम संपून ते परत घरी येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी कारवाई सुरू होती. ज्यामध्ये ड्रिंक आणि ड्राइव्हसह मास्क संदर्भातील कारवाई केली जात होती. मनोज याठिकाणावरून जात असताना पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक पोलीसांच्या गाडीला धडकली. या घटनेमुळे पोलिसांनी मनोज ठवकर यांना नाकेबंदीच्या ठिकाणी मारहाण केली. यामध्ये त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना तपासून मनोजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठ्या संख्येने मृताचे नातेवाईक गोळा झाले होते. नागरिकांनी पोलीस प्रशासन विरोधात रोष व्यक्त करणे सुरू केल्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.
- पोलिसांच्या मारहाणीमुळेच मनोज मृत्यु - नातेवाईकांचा आरोप
पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मनोजचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. शेकडो लोकांची गर्दी भवानी रुग्णालयासमोर जमली होती. पोलिसांच्या मारहाणीमध्येच मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.