नागपूर - जिल्ह्यातील पांढुर्णा परिसरात महामार्गावर सावळी फाट्याजवळ आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीच्या शरीरावर वार दिसत असल्यामुळे बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पांढुर्णा परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह, बलात्कार झाल्याची शक्यता - मोबाईल
तरुणीच्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत आहे. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत.
रस्ताच्या शेजारी पडलेला तरूणीचा मृतदेह
तरुणीच्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत आहे. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. त्यामुळे बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरुणीची ओळख पटली नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, हे उघडकीस येईल. पोलीस मृत तरुणीच्या मोबाईलचाही शोध घेत आहेत. त्यावरुन कॉल रेकॉर्डची चौकशीही केली जाणार आहे.