नागपूर- 18 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करतात. संग्रहालय म्हणजे जुन्या काळातील वस्तू जपून ठेवण्याची जागा. त्या वस्तू पाहण्याची व समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय हे देशातील सर्वात जुन्या संग्रहालयामधील एक. देशातील 10 मोठ्या संग्रहालयांपैकी नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयाचा चौथा क्रमांक लागतो.
जागतिक संग्रहालय दिन विशेष : 156 वर्षे जुने नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय - museum
नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय हे देशातील सर्वात जुन्या संग्रहालयामधील एक. देशातील 10 मोठ्या संग्रहालयांपैकी नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयाचा चौथा क्रमांक लागतो.
जागतिक संग्रहालय दिन विशेष : 156 वर्षे जुने नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय
पुरातन कला आणि संस्कृतीचा संगम असलेले हे संग्रहालय 156 वर्ष जुने आहे. ब्रिटिश सरकारने 1863 साली याची बांधणी केली. ह्या संग्रहालयात एकूण 10 दालने आहेत. ज्यात विविध विषयांवर संग्रहीत वस्तूंचा समावेश आहे. अंध व्यक्तींना या वस्तूंची माहिती व्हावी म्हणून ब्रेल लिपीची देखील व्यवस्था येथे करण्यात आली आहे.