नागपूर - कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झेंडा चौकाजवळ असलेल्या शनी मंदिर परिसरात एका महिलेने स्वतःच्याच नवऱ्याची हत्या केली. या प्रकरणात त्या महिलेला तिच्या मुलाने मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीस ताब्यात घेतले आहे. राजू अडुळकर असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून आरोपी पत्नीचे नाव उषा असे आहे.
नागपूर : मुलाच्या मदतीने महिलेने केला नवऱ्याचा खून - kill
राजू अडुलकर हे तापट स्वभावाचे होते. त्यामुळे राजू आणि उषा यांच्यात नेहमीच खटके उडायचे. राजू हा संशयी स्वभावाचा असल्याने देखील त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्यामुळे दोघेही गेल्या पाच वर्षांपासून सोबत रहात नव्हते.
राजू अडुलकर हे तापट स्वभावाचे होते. त्यामुळे राजू आणि उषा यांच्यात नेहमीच खटके उडायचे. राजू हा संशयी स्वभावाचा असल्याने देखील त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्यामुळे दोघेही गेल्या पाच वर्षांपासून सोबत रहात नव्हते. आज संध्याकाळी सातच्या सुमारास राजू हा उषाच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ करू लागला ज्यामुळे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी उषाने रागाच्या भरात राजुची निर्घृण हत्या केली. यात उषाच्या मुलाने तिला मदत केल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजू यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवले आहे. आरोपी उषा अडूळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.