महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Local Body Elections 2021 : आज राज्यभर नगरपंचतसाठी होतय मतदान, विदर्भातील 40 नगरपंचायतींचा समावेश

राज्यात नगरपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. (Maharashtra Local Body Elections 2021) यामध्ये विदर्भातील 38 तर नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.(Local Body Elections 2021) यात नागपूरच्या हिंगणा आणि कुही या दोन ठिकाणी दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

नगरपंचायत कार्यालय हिंगणा
नगरपंचायत कार्यालय हिंगणा

By

Published : Dec 21, 2021, 7:04 AM IST

नागपूर - राज्यभरात 106 नगरपंचायत निवडणूकीत विदर्भातील 38 तर नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. (Maharashtra Local Body Elections 2021) यात नागपूरच्या हिंगणा आणि कुही या दोन ठिकाणी दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. परवा पार पडलेल्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का बसला होता. (Nagar Panchayat Election Vidarbha 2021) यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी जोरदार प्रचार केला आहे. यामुळे स्थानिक विषयावरील निवडणुकीत रंगत वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले.

चारही पक्ष आमने सामने

यात नागपूर शहराला लागून असलेल्या हिंगण्याची मोठी नगर पंचायत आहे. याठिकाणी 17 जागेसाठी दुसरी सार्वत्रिक निवडणूक असून प्रचार तोफा थंडावल्या नंतर मंगळवारला मतदान होत आहे. (Local Body Elections 2021) पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने 13 जागेसाठी मतदान होईल. याठिकाणी मागच्या खेपेला राष्ट्रवादी भाजपची लढत पाहायला मिळाली. पण यंदा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यावर (Nagar Panchayat Election Hingana 2021) म्हणजेच रस्ते पाणी विकास याविषयावर निवडणूक होत यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीसोबत, काँग्रेस आणि शिवसेनेही निवडणूकीत उडी घेतली असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीचे मित्रपक्ष हे निवडणूकीत स्वबळावर नारा देत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात काँग्रेसचे नेते तथा पालकमंत्री नितीन राऊतही प्रचारात दिसून आल्याने राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रामेशचंद्र बंग, कानी भाजपचे हिंगणा मतदार संघाचे आमदार समीर मेघे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बलाबल आणि फोडफोडीचे राजकारण

हिगांणा नगरपंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक 17 सदस्यसंख्या असून 11 राष्ट्रवादीकडे तर 6 भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यात पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादी पक्षाने सत्ता स्थापन करत टिकवण्यात यशस्वी ठरले. यात काँग्रेसने काही उमेदवार उभे केले होते पण नंतर माघार घेतली. नंतरच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीचे तीन सदस्य फुटले त्यामुळे भाजपचे संख्याबळ 6 वरून सदस्य संख्या 9 झाले. त्यामुळे शेवटच्या अडीच वर्षात सत्ता भाजपचच्या ताब्यात राहिली.

राष्ट्रवादी भाजपचे प्राबल्य

हिंगणा नगर पंचायातीच्या निवडणुकीत मागील एकूण 17 पैकी 13 जागेसाठी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने 18 जानेवारीला 4 जागेसाठी मतदान होणार आहे. 45 उमेदवार रिंगणात आहेत. मागीलवेळी बहुमत भाजपकडे असताना 9 भाजप 8 राष्ट्रवादी असे संख्याबळ होते, यात अडीच वर्षात नगराध्यक्ष म्हणून छायाताई भोसकर यांनी उपाध्यक्ष हेमलता देशमुख यांनी सत्तेचा कारभार सांभाळला.

47 उमेदवार रिंगणात

या निवडणुकीत मतदार याद्या तयार करतांना अनेकांचे नाव एका वॉर्डातून दुसऱ्या वार्डात गेल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे मतदानाच्या दिवशी हा घोळ समोर आल्यास आणखी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या 17 वार्डात 9072 मतदार आहेत. यात 4709 पुरुष आणि 4363 महिला मतदार आहे. यंदा 47 उमेदवार रिंगणात आहे.

हेही वाचा -ST workers strike : अखेर 54 दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, पण...

ABOUT THE AUTHOR

...view details