महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Order to inspect : नागपुरातील २१ गावांमधील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित - Environment Minister Aditya Thackeray

नागपुर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज केंद्राजवळ (Koradi, Khaparkheda Power Station) 21 गावांमधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये विषारी घटक आढळून आले आहेत. (Water sources in 21 villages in Nagpur are polluted) यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तपासणी करणाऱ्या संस्थांसोबत पाहणी करून अहवाल ( Order to inspect) देण्याचे आदेश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी दिले आहेत.

Aditya Thackeray
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

By

Published : Mar 5, 2022, 5:16 PM IST

मुंबई:नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या दोन वीज केंद्रा जवळच्या २१ गावांमधील घेतलेला पाण्याचा नमुना यांमध्ये आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लोराईड यासारखे विषारी घटक आढळून आले आहेत. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असर व मंथन या खाजगी संस्थांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये येथील पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सादर केला होता.
याबाबतच्या तक्रारी केंद्रीय पर्यावरण व वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडे ही करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात २१ गावांमध्ये पाण्याचे स्रोत अंशतः दूषित झाल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत छापील उत्तरात दिली. याबाबतचा प्रश्न आमदार विकास ठाकरे आणि नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पाहणी
यासंदर्भात संबंधित संस्थेने केंद्रीय पर्यावरण वनी आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या मंत्रालयाच्या नागपूर प्रतिनिधी आणि औष्णिक वीज प्रकल्पाचे अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, असर आणि मंथन या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत संकलित केलेल्या पाण्याच्या नमुन्यां मधे जड धातूचे प्रमाण आढळून आले नव्हते.

आदित्य ठाकरे यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश
दरम्यान. या प्रश्नासंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये नांदगाव, अँश बंड या ठिकाणी केलेल्या स्थळ पाहणीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तसेच संस्थेच्या प्रतिनिधींना संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details