नागपूर: गेल्या आठ दिवसांपूर्वी एका ५७ वर्षीय शिक्षकाने बारा वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या प्रयोग शाळेतच अनेकदा बळजबरीने बलात्कार केले की घटना समोर आली होती त्यानंतर आता या वॉचमनने नऊ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र सतापाची लाट उसळली आहे. महेश गोपालदास रहांगडाले (५७) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलगी सोबत केले अश्लिल कृत्य: नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फिर्यादी यांची नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी सायकल घेण्याकरीता बिल्डींगच्या पार्किंगमध्ये गेली असता, तेथील चौकीदार आरोपी महेश गोपालप्रसाद रहांगडाले याने पिडीत मुलीस आपले रूम मध्ये नेवुन तिचे सोबत अश्लिल कृत्य केले.
आरोपीच्या पत्नीची साथ: पिडीत मुलीने रडत-रडत ही बाब आरोपीची पत्नीला सांगीतली. तेव्हा आरोपीचच्या पत्नीने घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरूध्द कलम ३७६ (२) (एन), ३७६ (अ) (ब), ५०६, भादवि सहकलम ४, पोक्सो कायदा अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपी महेश गोपालदास रहांगडालेला अटक केली आहे. पुढे आरोपीच्या पत्नीला देखील अटक होण्याची शक्यता आहे.
५७ वर्षीय शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार: गेल्या आठवड्यात एका ५७ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. संजय विठ्ठल पांडे असे नराधम शिक्षकाचे नाव असून आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शिक्षक गेली पाच महिने धमकी देत मुलीवर अत्याचार करत असल्याची बाब देखील तपासात समोर आली होती. १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सहावी मध्ये शिक्षण घेत होती. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. त्यामुळे मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्याबाबत तिने एक-दोन वेळा आईला ही बाब सांगीतली होती. चार दिवसांपूर्वी पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी परत आल्यावर तिने तिचे शाळेत गणित शिकविणारे शिक्षक आरोपी संजय विठ्ठल पांडे याने पेपर सुटल्यानंतर तिला विज्ञान प्रयोग शाळेत नेवुन तिच्यावर जबरी संभोग केल्याने पोटात त्रास होत आहे असे सांगीतले.
हेही वाचा: Thane Crime मैत्रिणीला भररस्त्यात थांबवून केला प्रपोज तिचा नकार अन्सपासप वार मित्र फरार