नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांना कोव्हॅक्सिन लसीची प्रतिक्षा लागली आहे. नागपुरात कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू आहे. या लसीचा पहिला डोस १४ दिवसांपूर्वी देण्यात आला होता. त्यानंतर आज दुसरा डोस सात जणांना दिला गेला. या लसीच्या डोजसाठी स्वयंसेवक स्वतः पुढे येत चाचणीसाठी पुढकार घेत होते. पहिल्या डोसनंतर स्वयंसेवकांना त्यांच्या शरीरात सकारात्मक बदल जाणवत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. शिवाय या स्वयंसेवकांना काही कोविडचे लक्षणे आहेत का? याची चाचणी करून ५ एप्रिलला त्याचे रक्त हे दिल्लीला पाठवून त्यात अँन्टीबॉडिज विकसित झाले का? हे तपासणार असल्याचे डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिन लसीचा आज दुसरा डोस, पहिल्या डोसनंतर स्वयंसेवकांना जाणवतोय बदल
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. अशातच कोव्हॅक्सिन लसीची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. नागपुरातील गिल्लुरकर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीबाबत चाचणी सुरू आहे. ५५ स्वयंसेवक पुढाकार घेत या चाचणीसाठी तयार झाले आहेत. १४ दिवसांपूर्वी या स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर आज कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस या स्वयंसेवकांना देण्यात आला. त्यामुळे पहिल्या डोसनंतर शरीरात सकारात्मक बदल जाणवत असल्याची प्रतिक्रिया स्वयंसेवकांनी दिली आहे.
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. अशातच कोव्हॅक्सिन लसीची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. नागपुरातील गिल्लुरकर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीबाबत चाचणी सुरू आहे. ५५ स्वयंसेवक पुढाकार घेत या चाचणीसाठी तयार झाले आहेत. १४ दिवसांपूर्वी या स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर आज कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस या स्वयंसेवकांना देण्यात आला. त्यामुळे पहिल्या डोसनंतर शरीरात सकारात्मक बदल जाणवत असल्याची प्रतिक्रिया स्वयंसेवकांनी दिली आहे. शिवाय कोरोना बाबतची भीती या लसीमुळे वाटत नसल्याचेही स्वयंसेवकांनी सांगितले. त्याचबरोबर आज दिलेल्या डोसनंतर या स्वयंसेवकांचे रक्त तपासणीसाठी दिल्लीला पाठवून त्या रक्तात अँटिबॉडिज किती प्रमाणात विकसित झाल्या आहेत? याची तपासणी करणार असल्याची प्रतिक्रिया संशोधक डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी दिली आहे.
लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांकडून मिळत असलेला प्रतिसाद हा सकारात्मक चाचणीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय दुसरा डोस दिल्यानंतर या स्वयंसेवकांना दोन तास निरीक्षणात ठेवून त्यांच्यात कोणत्याही रिअॅक्शन आढळून न आल्यास त्यांना घरी पाठवणार असल्याचे डॉ. गिल्लुरकर यांनी सांगितले. दुसऱ्या डोसनंतर या स्वयंसेवकांना २८ व्या दिवशी बोलवून त्यांची पुन्हा चाचणी करून त्यांच्या शरीरात किती प्रमाणात अँटिबॉडिज निर्माण झाल्या आहेत? याची चाचणी केली जाणार असल्याचेही डॉ. गिल्लुरकर यांनी सांगितले. शिवाय या दोन्ही चाचणीतून अँटिबॉडिज वाढल्या तर ही चाचणी यशस्वी होईल, असे डॉ. गिल्लुरकर म्हणाले. त्याचबरोबर दुसऱ्या लसीनंतर शरीरात व दैनंदिन क्रियेत बदल जाणवत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. शिवाय या लसीमुळे कोरोनाबाबतची मनातली भीती निघाल्याची प्रतिक्रिया स्वयंसेवकांनी दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसनंतर पुढील अहवाल काय येईल याची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे.