नागपूर :दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पेट्रोल पंप मालकाची निर्घृण हत्या झाली होती. हत्येच्या घटेनचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ज्यामध्ये दिलीप सोनटक्के हे पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले असताना ३ युवकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी धारधार शस्त्रांनी दिलीप सोनटक्के यांच्यावर सुमारे शंभर वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यातील एक आरोपी हा परत आला. त्याने जमिनीवर कोसळलेल्या दिलीप सोनटक्के यांच्यावर परत वार केले. अंगाचा थरकाप उडवून टाकणारा हा व्हिडीओ असून याच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
विवाहबाह्य संबंधातून हत्या : ६० वर्षीय दिलीप सोनटक्के यांची विवाहबाह्य संबंधातुन हे हत्याकांड घडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी उमरेड भागात एक फ्लॅट देखील खरेदी केला होता. तिथे ते एका महिले सोबत राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नेमकी ती महिला कोण आहे या संदर्भात मात्र, अद्याप खुलासा झाला नाही. या हत्येशी तिचा संबंध आहे का याबाबत ही पोलिसांनी माहिती उघड केलेली नाही.