नागपूर -राज्याचे क्रीडा आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि कामठी मतदारसंघातील भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बैठकीला बोलवले नाही म्हणून भाजप आमदाराने वाद घातल्याचे बोलले जात आहे.
नागपूर : मंत्री आणि आमदारांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल - क्रीडा आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात पालकमंत्री नितीन राऊत यांनी वादळी पावसामुळे विजेचे खांब पडलेल्या भागाचा दौरा केला. त्यानंतर मौदा तहसील कार्यालयात बैठक सुरू असताना वाद झाला.
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात पालकमंत्री नितीन राऊत यांनी वादळी पावसामुळे विजेचे खांब पडलेल्या भागाचा दौरा केला. त्यानंतर मौदा तहसील कार्यालयात बैठक सुरू असताना वाद झाला. भाजप आमदारांच्या 'मला बैठकीला का बोलावलं नाही' या प्रश्नाला मंत्री सुनिल केदार यांनी यावेळी 'भाजप सरकार असताना आम्हाला किती वेळा बैठकीला बोलावले' अशा शब्दात उत्तर दिले.
हेही वाचा -कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
TAGGED:
पालकमंत्री नितीन राऊत