नागपूर - विदर्भवादी पक्ष लोकसभेप्रमाणेच विदर्भातील विधानसभेच्या ४२ जागा लढवणार आहे. विधानसभेसाठी विदर्भवादी पक्षातर्फे ४० वर्षांखालील तरुण उमेदवार उभे राहतील. विदर्भाच्या ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. त्यामुळे हीच तरुण मुले सत्तेत अली, की विदर्भातील प्रश्न मार्गी लावतील, असा उद्देश ठेऊन विधानसभा लढविली जाईल, असे माजी महाधिवक्ता, विदर्भवादी पक्षाचे नेते श्रीहरी अणे यांनी सांगितले.
विदर्भवादी पक्ष विधानसभेसाठी तरुणांना संधी देणार - श्रीहरी अणे - chance
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूरच्या संविधान चौकात त्यांनी धरणे आंदोलन केले.
श्रीहरी अणे
आज महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत नागपूरच्या संविधान चौकात त्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी, सत्तेत असलेल्या भाजपनेही विश्वासघात केला आणि काँग्रेसकडूनदेखील काही अपेक्षा नाही, असे मत श्रीहरी अणेंनी व्यक्त केले.