नागपूर- येत्या काळात जावेद अख्तर विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना, असा वाद पेटून विकोपाला जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानसोबत करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की जावेद अख्तर यांचे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आणि पूर्वग्रह दूषित आहे. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांची तुलना तालिबान सोबत करून स्वतःच्या पद आणि प्रतिष्ठेचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.
जावेद अख्तर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धार्मिक सोहार्द्र बिघडू शकते. तालीबानी म्हणजे इस्लामिक शासनाचा क्रूर चेहरा शरीया कायद्यावर चालणाऱ्या देशात प्रगती आणि स्थैर्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले. आपण कुणासोबत राहायचे आणि कोणाशी संबंध जोडायची याचा विचार आता भारतीय मुस्लिमांनी करायला हवे, असा टोला पलांडे यांनी जावेद अख्तर यांना लागावला आहे. जावेद अख्तर यांचे वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचे असून संपूर्ण मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे असल्याचेही ते म्हणाले आहेत.
हिजाब प्रकरणी कारवाई व्हावी