नागपूर- प्रज्ञाभारती श्री.भा.वरणेकर जन्म शताब्दी सोहळ्याचे मुंडले सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी श्री.भा. वरणेकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्री.भा.वरणेकर प्रचंड बुद्धिमान होते, त्यांचे विचार प्रत्येकाने अंगिकारावे- मोहन भागवत
श्री.भा. वरणेकर यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी होती. त्यांच्याकडे विविध विषयांचे विपूल ज्ञान असतानासुद्धा त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. ते सर्वसामान्य नागरीका प्रमाणेच आपले जिवन जगले. वरणेकर यांच्या संदर्भात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
श्री.भा. वरणेकर यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी होती. त्यांच्याकडे विविध विषयांचे विपूल ज्ञान असतानासुद्धा त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. ते सर्वसामान्य नागरीका प्रमाणेच आपले जीवन जगले. वरणेकर यांच्या संदर्भात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, वरणेकरांच्या स्वभावात सरळपणा होता. मात्र आजच्या विद्वानांमध्ये वरणेकरांसारखे गुण दिसणे दुर्मिळ झाले आहे. वरणेकर यांना भारतरत्न दिला असता तर त्यांनी नाकार दिला असता.
सरकारी सन्मान विद्वानांनी घ्यावा की नाही, त्यावर वरणेकर यांचे वेगळे मत होते. काही माणसे अशी असतात जी समोर येत नसतात. पण सगळ्याच क्षेत्रात मोठे काम करून जातात. वरणेकरही तसेच होते. प्रत्येक विषयाचा त्यांना गाढा आभ्यास असून ते प्रचंड बुद्धिमान होते. ते ज्यावेळी बोलत असत त्यावेळी ऐकणारा भान हरपून त्यांचे विचार ऐकायचा. त्यांचे विचार प्रत्येकाने अंगिकारावे ही अपेक्षा मोहन भागवतांनी व्यक्त केली.