नागपूर:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, वारंवार अशी वक्तव्ये करून समाजात कटुता निर्माण कुणीही करू नये, असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार नाहीत, असे माझे वैयक्तिक मत आहे. 2024 ची निवडणूक भाजप धार्मिकेतेवर लढणार ही शक्यता नाकारता येत नाही. राम मंदिराचा विषय पुढे करून प्रचार करेल. मात्र, आम्ही राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्यावरच निवडणूक लढू असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. भाजप लोकसभा मिशन 400 हे आम्ही ऐकत असतो. आम्ही आमची तयारी करतो आहे पण जाहीरपणे बोलत नाही.
ऊस उत्पादनात नंबर वन करायचं आहे: ऊसाच्या उत्पनात जगात भारत क्रमांक एक वर तर भारतात ऊस उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणारे पीक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे उप केंद्र नागपूर व्हावे असे मला वाटत होते. गडकरींची देखील तशीच इच्छा आहे. त्याकरिता आम्ही आवश्यक जमीन खरेदी करून लवकरात लवकर संशोधन सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील एक ते दीड वर्षांत इन्स्टिट्यूटची उभारणी करू आणि 50 एकर जागेवर ऊसाचे पीक घेऊन ते पीक कसे घ्यावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणार असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. ऊसाच्या मोलासिस पासून इथेनॉल तयार होत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.