नागपूर - लोकसभा निवडणुकसाठी नागपूर मतदारसंघातून नाना पाटोले निवडणूक लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती त्यांनी समाज माध्यमातून प्रसृत केली होती. पण, ही माहिती चुकीची असून, आपण पाठिंबा दिला नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव कुशल मेश्राम यांनी स्पष्ट केले आहे.
नाना पाटोलेंना पाठिंबा नाही; वंचित बहुजन आघाडीचे स्पष्टीकरण
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. दोन तीन दिवसात नागपूर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल.
कुशल मेश्राम
नाना पाटोले मतदारांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असे मेश्राम म्हणाले. नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. दोन तीन दिवसात नागपूर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल. फक्त नागपूरमध्येच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.