महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राष्ट्रवादी सोबतचं नातं तोडा, ..अन्यथा राज्यातही राजकीय भूकंप' - रामदास आठवले

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने फोडले नसून राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचाच विश्वास उरलेला नाही. आणि म्हणूनच ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून बाहेर पडले. मध्य प्रदेशात जसा राजकीय भूकंप झाला तसाच राजकीय भूकंप महाराष्ट्रात देखील होईल, असा इशाराही आठवलेंनी ठाकरे सरकारला दिला आहे.

nagpur
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच नात तोडावं, अन्यथा मध्य प्रदेशप्रमाणे राज्यातही राजकिय भूकंप - रामदास आठवले

By

Published : Mar 16, 2020, 7:48 PM IST

Updated : Mar 17, 2020, 7:54 AM IST

नागपूर -शिवसेना पक्ष प्रमुखउद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकदा विचार करून काँग्रेस भाजप सोबत यावे, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मध्यप्रदेश येथे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीसाठी आठवलेंनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसच्या चुकांमुळे त्यांचे सरकार धोक्यात आले आहे. मध्य प्रदेशमधील राजकीय परिस्थितीसाठी भाजपला दोष देण्यात काहीही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच नात तोडावं, अन्यथा मध्य प्रदेशप्रमाणे राज्यातही राजकीय भूकंप - रामदास आठवले

हेही वाचा -आठवलेंचा नवा नारा... म्हणून जागा झाला देश सारा

आठवले म्हणाले, की मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने फोडले नसून राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचाच विश्वास उरलेला नाही. म्हणूनच ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून बाहेर पडले. मध्य प्रदेशात विश्वास दर्शक ठराव पुढे ढकलण्यात आला आहे. पण हे काही ठीक नाही, असे आठवले म्हणाले. कमलनाथ यांचेकडे बहुमत नाही, त्यामुळे मध्य प्रदेशात लवकर भाजपचे सरकार येईल, असा दावाही आठवले यांनी केला. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी अनेकदा अनावश्यक टीका करीत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला.

हेही वाचा -कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी शासकीय ग्रंथालय बंद, सरकारच्या निर्णयाला विद्यार्थ्यांची साथ

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकदा विचार करून पुन्हा भाजप सोबत यावे, असेही आठवले म्हणाले आहेत. अन्यथा मध्य प्रदेशात जसा राजकीय भूकंप झाला तसाच राजकीय भूकंप महाराष्ट्रात देखील होईल, असा इशाराही आठवलेंनी ठाकरे सरकारला दिला आहे.

Last Updated : Mar 17, 2020, 7:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details