महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरटीई अंतर्गत पाहिल्या टप्प्यात ३ हजार ५३८ विद्यार्थांनी घेतला प्रवेश

आरटीई अंतर्गत ३ मेपर्यंत ३ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ७ हजार २०४ जागांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. त्यापैकी ३ हजार ५८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला असून उर्वरीत जागा दुसऱ्या टप्पात भरल्या जातील.

आरटीई अंतर्गत पाहिल्या टप्प्यात ३ हजार ५३८ विद्यार्थांनी घेतला प्रवेश

By

Published : May 4, 2019, 7:08 PM IST

नागपूर -आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थांना खाजगी शाळेत प्रवेश मीळावा यासाठी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित असतात. एप्रिल महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. ११ एप्रिल ते २६ एप्रिलदरम्यान कागदपत्र पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, या प्रक्रियेला ४ मेपर्यंत मुतदवाढ देण्यात आली होती. आज आरटीई कायद्यांतर्गत प्रवेशाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पालकांनी प्रेवशासाठी शाळेत गर्दी केली होती.

आरटीई अंतर्गत पाहिल्या टप्प्यात ३ हजार ५३८ विद्यार्थांनी घेतला प्रवेश

आरटीई अंतर्गत ३ मेपर्यंत ३ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ७ हजार २०४ जागांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. त्यापैकी ३ हजार ५८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला असून उर्वरीत जागा दुसऱ्या टप्पात भरल्या जातील. शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आरटीई प्रवेशासाठी राज्यातील सर्वात जास्त अर्ज नागपूर जिल्ह्यात होते. नागपूर जिल्ह्यात एकूण ५ हजार ७०० एवढे अर्ज पाहिल्या टप्पात आले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details