नागपूर :आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. आप्पासाहेबांचे व्यसनमुक्तीचे मोठे काम. पण सत्तेची नशा देश नासवते आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यां मित्रांच्या फायद्यासाठी होतो आहे. यांच्या मित्राचा क्रम मात्र श्रीमंतीत वाढतोय आणि देशाचा सगळ्या बाबतीत खालवतोय. ह्या भूमीत बाबासाहेबांनी माणसाला ओळख निर्माण करून दिली. आता भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज नागपूरात महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
उलट्या पायाचे सरकार :आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. राज्यात उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट सुरू आहे. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करुन दाखवले मग सभा घेतो आहे. गद्दारी करुन सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
राम मंदिरासाठी आमचाच आग्रह :मी अयोध्येला गेलो तेव्हा सुनील केदार पण सोबत होते. शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकार हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेत आहेत.
तर गुवाहाटीला न जाता अयोध्येत गेले असते : मुख्यमंत्री खरच राम भक्त असते तर सुरत गुवाहटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? हे गेले म्हणून फडणवीस गेले. इकडे अवकाळी पण राम राज्य महाराष्ट्रात, देशात कधी येणार? शेतकरी रडतोय मग मागून मुख्यमंत्री जाऊन बोलतात. आम्ही वेळीच मदत केली होती.
मी टॉप पाच मुख्यमंत्रीमध्ये होतो :घरातबसून कारभार करत असूनही तुमच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हव ? नागपूरला एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात आणणार होतो पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करतात.