महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bawankule Criticized Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर टीका करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत- बावनकुळे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

Bawankule Criticized Uddhav Thackeray
बावनकुळे

By

Published : Aug 7, 2023, 10:56 PM IST

नागपूर: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर आरोपांची सरबत्ती केल्यानंतर आता भाजप नेत्यांचीही उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे, ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष नीट सांभाळला आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासोबत विश्व राजकारण सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

फडणवीसांचे कौशल्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःच्या कौशल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकत्र घेऊन चालत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आमच्या नेत्यांवर टीका करून स्वतःची उंची वाढवण्याचे काम करत आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाबद्दल संभ्रम निर्माण करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहेत.


राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती:काँग्रेस नेते राहुल गांधीच्या संदर्भात कोर्टाने जो निकाल दिला आहे तो मान्य करावाच लागतो. त्यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने केवळ स्थगिती दिली आहे. खालच्या कोर्टाचा निकाल बदलेला नाही. नियमाप्रमाणे कारवाई झाली असेल आहे. त्यामुळे यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.


नाना पटोले यांना सिरीयसली घेऊ नका:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल आता काय बोलायचं. ते कुठली गोष्ट कुठेही जोडतात. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर तशी कारवाई केली. तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान करणारे शब्द बोलाल आणि कोर्टाने जर शिक्षा केली तर ही हुकूमशाही आहे, असे म्हणाल हे योग्य नाही. नाना पटोले यांना राजकारणासाठी बोलाव लागत आहे. शिक्षा अंतिम नाही, स्थगिती दिली आहे. नाना पटोले यांना सिरीयसली घेऊ नका, असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही वाचा:

  1. Jayant Patil Met Uddhav Thackeray : जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीमागचे सांगितले 'हे' कारण
  2. Jitendra Awhad On NCP Claim : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणीही दावा करू शकत नाही, तो आमचाच - जितेंद्र आव्हाड
  3. Prasad Lad on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाड यांची जहरी टीका; Watch Video

ABOUT THE AUTHOR

...view details