महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime : १२ तासात नागपुरात दोन खूनाच्या घटना, आरोपींना अटक - रघुविर शिवा मोहीनकर

नागपूर जिल्ह्यात 12 तासात दोन खुन झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूरच्या उमरखेड तालुक्यातील गंगापुरात शिल्लक कारणावरुन दोघांनी एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर दुसरेकडे एका पतीने पत्नीला भोसकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Two Murders In Nagpur
Two Murders In Nagpur

By

Published : Apr 7, 2023, 6:08 PM IST

नागपूर :अवघ्या १२ तासात नागपूर जिल्ह्यात दोन खून झाले आहे. उमरेड तालुक्यातील गांगापुर येथे किरकोळ भांडणातुन दोघांनी मिळून एकाची हत्या केली तर, दुसऱ्या घटनेत वाडी पोलीस ठाण्यात हद्दीत एका इसमाने पत्नीच्या पोटात चाकू मारून हत्या केली आहे. दोन्ही खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करून तपास सुरू केला आहे.

हाथबुक्याने मारहान :नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गांगापुर या गावात घडली आहे. यातील मृतक मृतक अनिस अजीज शेख (२७) यांची किरकोळ भांडणावरुन हत्या करण्यात आली आहे. आरोपी नितेश हरी मोहीनकर (२८), रघुविर शिवा मोहीनकर (३०) हे एकाच गावात राहणारे असुन एकमेकांना ओळखतात. काही कारणाने आरोपी, मृतक यांच्यात भांडन झाले. यावेळी रागाच्या भरात मृतकाने आरोपींना आई बहीणीच्या नावाने शिविगाळ केली. या कारणावरुन आरोपींनी संगणमत करुन मृतकाला हाथबुक्याने मारहान करत जखमी केले. त्यानंतर आरोपी नितेश हरी मोहीनकर याने लाकडी दांड्याने मृतकाचे डोक्यावर, छातीवर, तोंडावर वार करून खून केला. घटेनची माहिती समजताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपी नितेश हरी मोहीनकर, रघुविर शिवा मोहीनकर या दोघांना अटक केली आहे.

घरघुती वादातुन खुन :वाड़ी पोलिस स्टेशन अंतर्गत नवनीत नगर येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून मनोज सरोदे नामक इसमाने त्याच्या पत्नीला मारहाण केली. माधुरी सरोदे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी मनोज, माधुरी यांच्यात नेहमीच वाद होत असायचे. आज पहाटे देखील दोघांमध्ये भांडण झाले. वाद विकोपाला गेला असताना आरोपीने माधुरी सरोदेच्या पोटात चाकूने वार केले. ज्यात माधुरी सदोदे यांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मधुरीचा मुलगा नातेवाईकाच्या घरी झोपायला गेला होता. तर, मुलगी पोलीस भरतीसाठी बाहेरगावी गेलेली होती. आरोपी मनोज सरोदे, माधुरी यांच्यात नेहमी घरगुती वाद व्हायचे. मात्र, या वादाचे रूपांतर हत्येच्या घटनेत होईल असे कुणालाही वाटलं नसावे. आरोपी मनोज, माधुरी हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील रहिवासी आहेत. गेल्या सहा महिन्यापूर्वी ते दोन मुलांना घेऊन नागपुरात राहायला आले होते. पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मनोजला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray Vs CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात?

ABOUT THE AUTHOR

...view details