नागपूर - जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे,तर दुसऱ्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 19 वर जाऊन पोहचली आहे.
नागपुरात दोन कोरोना बधितांची भर, एकाचा मृत्यू तर दुसऱ्यावर उपचार सुरू - नागपूर कोरोना
जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे,तर दुसऱ्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूरच्या एका 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरच्या एम्समध्ये झालेल्या तपासणी अहवालात त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंडोनेशियावरून आलेला हा व्यक्ती दिल्लीहून नागपूरात आला होता. त्याला नागपूरच्या आमदार निवासाक क्वारंटाइन करण्यात आले होते. आज त्याचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कोरोना बाधित रुग्णाचा फेब्रुवारीनंतर चंद्रपूरशी संबंध आलेला नाही.