नागपूर : जिल्ह्यात आज(रविवार) २७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून ६० रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, नागपुरात कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होऊन संख्या १ हजार ४४३ वर पोहोचली आहे. तर, एका रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नागपुरात दिवसभरात २७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर, ६० जण कोरोनामुक्त - nagpur corona updates
आज नागपुरात २७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४४३ इतका झाला आहे. तर, आज ६० रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ७९ इतकी झाली आहे. याशिवाय आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उपराजधानी नागपुरात आज २७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४४३ इतका झाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधिच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली. ज्याचा अवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आज ६० कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ७९ इतकी झाली आहे. या शिवाय एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा मृत रुग्ण राजस्थान येथील रहिवासी आहे, त्याला उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा २४ वर गेला आहे. तर, सध्या नागपुरात ३३९ अॅक्टिव्ह रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी रुग्णालय कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७४ टक्के इतके आहे.