महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुकाराम मुंढेंनी घेतली पालिका कर्मचाऱ्यांची 'शाळा' - क्लास

आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्तीबाबतीचे धडे दिले.

कर्मचाऱ्यांची कानउघडनी करताना आयुक्त मुंढे
कर्मचाऱ्यांची कानउघडनी करताना आयुक्त मुंढे

By

Published : Feb 19, 2020, 9:37 PM IST

नागपूर- पदभार सांभाळल्यानंतर नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आले. आज त्यांनी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बैठकीतच क्लास घेतला. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात वर्तन कसे असावे, कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचवेळी एका कर्मचाऱ्याचा मोबाईल वाजल्याने ते कमालीचे संतप्त झाले आणि त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल काढून घेताला.

आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी बोलताना तुकाराम मुंढे यांनी प्रत्येकाने आपापले कर्त्यव्य जाणून घ्यावे, असे आवाहन केले. कर्त्याव्यपेक्षा आपल्या भूमिका महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या असा सल्ला त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिला. आपण वैयक्तिक भूमिकेपासून दूर राहावे आपल्या भूमिका म्हणजे नागपूरच्या समस्या सोडवणे असायला हवे. नागपूर शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्या, असे आपले कर्तव्य असावे. केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळ घालवायची म्हणून कामे न करता नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामे करा, असे टोलाही यावेळी आयुक्त मुंढेंनी कर्मचाऱ्यांना लगावला.

त्यावेळी आयुक्त मुंढेंची नजर जिन्सची पॅन्ट घालून आलेल्या कर्मचाऱ्यांवर पडली. मग, त्यांनी अधिकारी आहात अधिकाऱ्यांप्रमाणे दिसा. चांगले कपडे घाला. अन्यथा मला गणवेशाबात विचार करावा लागेल, असे सांगत तुम्ही शाळेत नाहीत. त्यामुळे शिस्तीत या, असे कर्मचाऱ्यांना आवाहन केले.

हेही वाचा -दुचाकी ग्राहकांना वाहन खरेदीवेळी 'हेल्मेट' न देणाऱ्या कंपनीसह विक्रेत्यांकडून ग्राहकांची होतेय फसवणूक

ABOUT THE AUTHOR

...view details